रविवारचा दिवस हाेता, थाेडा विरंगुळा म्हणुन मी FM (Frequency Modulation) ऐकायला घेतला. अनेकांना 'फुल फाॅर्म' माहीत नसेल म्हणुन वरील कंसात त्याचा उल्लेख केला. असो, माझा अर्थातच म्हणजे संगीत ऐकण्याचा महत्वाचा उद्देश हाेता. परंतु मला लगेच एक जाहिरात इच्छा नसुनही पूर्णपणे ऐकावीच लागली! एक मात्र खरं आहे या जगात 'फुकटात' काहीच मिळत नाही! हो! असाे, पुढील पाच ते दहा मिनिटे विविध जाहिराती एकामागुन एक धाड-धाड कानावर आदळत हाेत्या! मी थाेडा आवाज कमी केला, नशीब तेवढातरी पूर्ण अधिकार आपल्याला आहे! तेवढ्यात पुढे संगीतमय काहीतरी ऐकायला आलं, बहुदा गांण लागतं कि काय! असं समजुन मी आवाज पुर्णपणे वाढवला, आणि सुरु झालं "मेरा देश बदल रहा हैं...आगें बढ रहा हैं" अशा प्रकारच एक संगीतमय गाणं! गाणं कसलं! ती तर सत्तारुढ शासनाच्या पक्षाची एक जाहिरात हाेती.
आणि ही संगीतमय जाहीरात ऐकुन माझ्या डाेळ्यासमाेर देशाचे चालु वर्तमानाचे चित्र ऊभे राहिले! आणि त्यातील भेडसावणारा असंख्य प्रश्नांचा राक्षस! कदाचित माझ्याप्रमाणेच ही जाहिरात देशातील प्रत्येकांने कुठे तरीे ऐकली असेल! असं मी समजताे, आणि मुख्यविषयाकडे जाताे. खरचं आपला देश बदलताेय का? आणि पुढे जाताेयं का..? ऐकेकाळी जगात भारताला 'साप पकडणारा देश' म्हणुन संबाेधले जायचे पुढे त्याच देशाचे "डिजीटल इंडियात" रुपांतर झाले, डिजीटल चे लेबल लावुन भारत देश 'प्रतिगामी कात' टाकुन जगाबराेबर चालण्याचा 'पुराेगामी भास' दाखवताेय खरा! परंतु इथे बदल झाला ताे फक्त शब्दांचा, विचारांचा नाही. म्हणजे बघाना आत्ताची दु:खद घटना 'बुलंदशहर'- उत्तरप्रदेश मध्ये एका गाेहत्तेच्या कारणावरुन जमावाने पोलीस स्टेशनवर हल्ला करुन एका निष्पाप कर्तव्यदक्ष प्रामाणिक वरिष्ट निरीकक्षकाला(PI) गंभीर जखमी करुन मृत्यूमुखी पाडलं, विशेष म्हणजे कर्तव्य बजावत असतानाच अधिकार्याच्या मृत्युदेहाला एक सन्मान म्हणुन देशाचा राष्ट्रधव्ज तिरंगाही मिळु नये! आणि शाेकांतिका अशी आहे की, मद्य पिऊन नशेत एक सिनेअभिनेत्री अंघाेळीच्या टब मध्ये ताेल जाऊन बुडुन मरते तिला मात्र तिरंग्यात लपेटलं जातं! हा विरोधाभास समजने कठीण असाे, मागील काही दिवसापुर्वीची बुलंदशहर घटना म्हणजे १९२२ मधील असहकार चळवळी दरम्यान घडलेली "चाैरीचाैरा घटणेची" पुनरावृत्तिच म्हणावी लागेल! याेगायाेग दाेन्हीं घटना उत्तरप्रदेश मधीलच! परंतु १९२२ मधील चाैरीचाैरा घटना वेगळी आणि २०१८ मधील स्वतंत्र भारतातील ही घटना वेगळी. १९२२ मधील घटना "स्वातंत्र्य चळवळीशी" संबधीत हाेती, तरीही ती हिंसक घटना असल्याकारणाने पितामाह "महात्मा गांधीजीनी" चळवळ मागे घेतली हाेती. २०१८ मधील 'बुलंदशहर'- उत्तरप्रदेशातील घटना ही विशिष्ट धर्माशीच संबधीत आहे! यात अजिबात शंका नाही. परंतु हे देशाच्या दृष्टिने अतिशय घातक आहे. परंतु १९२२ ला प्रत्यक्ष महात्मा गांधीजी अस्तित्वात हाेते, म्हणुन ते थांबवता आलं! आणि आज "महात्मा गांधीजीच्या चष्म्याचा वापर करुन खाेट्या जाहीराती!" अस्तित्वात आहेत! म्हणजे सर्व 'राजकारण मंगलमय' आहे. देशातील काही जातीयवादी संघटनांना जिवंत माणसांपेक्षा प्राणी महत्वाची आहेत! असच म्हणावं लागेल! यालाच आपण "देश बदलताेय...पुढे जाताेय..." अस म्हणायचं का?
आज भारताने विज्ञानाच्या माध्यमाद्वारे मंगळ, चंद्र ग्रहा पर्यंत झेप घेतली व जगात वाहवाह मिळवली! त्याच भारतात अंधश्र्दाच्या दृष्टिकाेनातुन मुला-मुलीला केवळ मंगळ आहे म्हणुन, आपण लग्न जमवत नाही! काय तर म्हणे काेप हाेईल! अजून किती दिवस आपण अंधश्र्देच्या कुबड्या वापरणार आहाेत? जगात असा ऐकमेव देश असेल जाे काॅम्पुटरवर राशी-भविष्य, व जन्म कुंडलीचे भाकीत वर्तवताे! यालाच आपण देश बदलताेय म्हणायचं का? त्याच भारतात एक तरुण धार्मिक दंगे घडवण्यासाठी किंवा सामाजिक असंताेष निर्माण करण्यासाठी "नालासाेपारा" येथे घरातच स्पाेटके तयार करतांना पकडला जाताे. दिल्लीतील ज्या रामलीला मैदानावर ऐकेकाळी तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्रीनी "जय जवान..जय किसान" अशी घाेषणा दिली हाेती, आज त्याच ठिकाणी शेतकरी बांधवाना उपाेषण करण्याची वेळ आली. त्याच बराेबर काही कर्मठ मुठभर मनुवाद्यांनी भारतीय राज्यघटना जाळण्याचा पर्यंत्न केला, तसेच देशातील विचारवंताना, पत्रकारांना गाेळी झाडुन संपवल जातयं. हे सर्व देशात घडत असताना आपण देश बदलताेय आणि पुढे जाताेयं चे गाणं कसे काय वाजवू शकताे? ज्या स्वातंत्र्यासाठी संपुर्ण देशातील सर्व जाती-धर्मातील व समाजातील लाेकांनी एकत्र येऊन ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला, रक्त सांडले, शिक्षा भाेगली, बलिदान दिले, आणि ताेच स्वातंत्र्य मिळालेला भारत देश आज ऐकमेकांना संपवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे! आणि "मेरा देश बदल रहा हैं... आगे बढ रहा हैं...!" च्या 'पुळचट', 'भाबड्या' जाहीराती ऐकवुन देशाची दिशाभुल करत आहे.
मानव विकास निर्देशांकचा (HDI) जर आपण विचार केला तर भारत आज जगाच्या तुलनेत फार पाठीमागे आहे. फक्त (GDP) स्थुल देशाअंतर्गत विकासाचे "फुगीर" आकडे जगाला दाखवण्यातच आपण धन्यता मानताे! दुसरीकडे देशात ७०% पेक्षा आधिक लाेकांना गरजे पुरते दाेन वेळचे खायला अन्न नाही, निवारा, राेजगार नाही थाेडक्यात सांगायचे म्हणजे देशात गरजेच्या पायाभुत सुविधा ऊपलब्ध नाहीत, आणि आपण "देश बदलताेय, पुढे जाताेय...!" ह्या जाहीरातीेचे गाणं वाजवत फिरताेय! परंतु आजच्या या "घातक बदलाला" काेण..? थांबवेल यावरच मुळात प्रंश्नचिंन्ह (?) आहे.
✒ सतीश इंगळे.
Article by Satish Ingle.