गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न घेता त्या मागील औपचारिक मुख्य संकल्पणा लक्षात घ्यावी, जरी आपल्याला लाेकशाहीने विचाराचे व बाेलण्याचे मुक्त स्वातंत्र्य दिले असले, तरीही काही बाबीचां जाणीवपूर्वक अनौपचारिक रित्या उल्लेख करावा लागताे नाहीतर "कन्हैया कुमार" हाेताे! असाे. त्याचा पुढे स्पष्ट उलगढा हाेईलचं.
अठराव्या शतकाच्या मध्यापासुन इंग्रजांनी भारतात पाय राेवण्यास सुरवात केली त्यांनीही भारतीयांना प्रथम व्यापारी वखारी स्थापणेचे एक प्रकारचे गाजरच दाखवले हाेते, पुढे अनेक शतके काय झाल ते आपण सर्वजन जाणुन आहाेत. आता तूम्हांला 'गाजर' या शब्दाची संकल्पणा लक्षात आली असेलच! अनेक खाेटी आश्वासनं, लुट, छळ करुन ब्रिटिशांनी भारतावर हुकुमशाहीने राज्य केलं, अाणि अगदी त्यांच्या प्रमाणेच 'गाजर' या संकल्पणेचा वापर भारतात स्वातंत्र्यापासुन ते आजपर्यंत भारतीय राज्यकर्ते 'लाेकशाहीच लेबल' लावुन करत आलेत, आणि करतायेत. मग सरकार कुणाचही असाे!
गंमत बघा निवडणुका जवळ आल्या की विकास कामांना जरा जास्तच वेग येताे! शहरापासुन ते खेड्या-पाड्या पर्यंत विविध भागांचे दाैरे हाेतात, माेठ-माेठ्या जाहीर सभा हाेतात, सभेतील भाषनात अक्षरशहा 'गाजरांची गारपीठच'(खाेटी आश्वासने) हाेते! पुढे "निवडणूक आचारसंहिता" लागण्यास थाेडेच दिवस शुल्लक राहिलेले असतात, तेव्हां घाई-घाईने गरज पडल्यास सरकारी हेलिकाॅप्टर(चाेपर) वर स्वार हाेऊन पुढारी नेते अगदी दुर्गम भागात आभाळातुन खाली उतरुन लाेकांना दर्शन देतात! खरं म्हणजे सरकारी हेलिकाॅप्टर हे लाेकांच्या कररुपी पैशावरच आभाळात उडत असतात, तरीही नागरीक त्याला बघण्यास गर्दी करतात हे विशेष! या ठिकाणी विविध "गाजर विकास कामाचे" उदघाटन समारंभ माेठया थाटात उरकुन पुढारी नेते माेकळे हाेतात! त्यात मग जुन्याच रस्तत्यावर नवीन रस्ते ऊभारणीच्या पाट्या लावुन नारळ फाेडणार, खुप झाले तर शंभर-दाेनशे मिटर अंतरापर्यंत माेठ माेठी दगडे व काही प्रमाणात डाबंर अंथरुन काम चालु केले अस दाखवणार! कामाचे उदघाटन साेहळा तर किलाे मीटर मध्ये झालेले असताे, परंतु प्रत्यक्षात काम काही मिटरवरच झालेले असते! ताे पर्यंत इकडे निवडणूक आचारसंहिता लागु हाेते आणि विकास कामे जिथल्या तिथे ठप्प हाेऊन जातात. मग काय..? ताे पुढारी नेता निवडुन आला काय..किंवा नाही काही फरक पडत नाही! रस्तत्यावरील ते टाकलेले खडी, डांबर पुढील पाच वर्ष इकडून-तिकडे खेळत असतात! आणि उदघाटन पाट्याचां कलर ऊडालेला असताे! पुन्हां पाच वर्षांनी त्यालाच नवीन रंग मारुन पुढे निरंतर हिच प्रक्रिया चालु राहते.
शेतकरी बांधवांना माेठ माेठी गाजर दाखवायची(हमी भाव) मुबलक वीज पुरवठा, पाणी, माेठी बाजारपेठ, परंतु प्रत्यक्षात काहीच नसते. प्रत्येकाला राेजगार, रस्ते शेतकर्यानां हमी भाव, व्यापाराची भरभराट, प्रत्येकाला घर, संपूर्ण गरीबी निर्मुलन, सर्वांना शिक्षण, चांगली मुबलक आराेग्य सुविधा, विविध आरक्षण...ईत्यादी वर्षान वर्षे दाखवत आलेले गाजरांचे काही उत्तम उदाहरणे आहेत. अगदी अलीकडील काही 'नवीन गाजर' प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये, १००% भ्रष्टाचार मुक्त भारत!, काळा पैसा(धन) देशात परत आणनार! वगैरे.. तसे पाहता अशी गाजरे(आश्वासने) खुप आहेत ती सर्व या ठिकाणी सांगीतली तर भारत देश इकडेच महासत्ता हाेईल! गाजरांचा पाऊस फक्त भारतातच पडताे असे मी मुळीच म्हणनार नाही, संपुर्ण जगात ताे पडताे, फरक एवढाचं त्याचे प्रमाण कमी-जास्त असु शकते!
✒ सतीश इंगळे.
Article by Satish Ingle.

No comments:
Post a Comment