भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र माेदी सत्येत आल्यापासुन एकचं वाक्य जास्त बाेलताना दिसतात! "मित्राैं...पिछले सत्तर सालाें मैं...??" एव्हांना ते सभेत भाषनाची सुरवात करणे असाे, किंवा साेशल माध्यमांवर व्यक्त हाेणे असाे, पंतप्रधान नेहमीच सुरवात याच वाक्यापासुन करतात. यातुन ते नक्की मागील सत्तर वर्षातील काॅग्रेस पक्षाला हिशाेब मागतात.? कि, उपदेश देतात! हेच काही कळायला मार्ग नाही. मागील सत्तर वर्षात जर काहीच प्रगती झाली नसती, तर आज जाे काही भारत आपण बघताेयं किंवा अनुभवताेयं असा ताे असता का? किंवा जी काही प्रगती देेेशात झाली ती काय फक्त मागील पाच वर्षातचं झाली का? या प्रश्नांंच उत्तर ईयत्ता पाचवीतील विद्यार्थी सुद्धा देेेेतील! परंतु याचा अर्थ असा मुळीच हाेत नाही, कि मागील सत्तर वर्षात काॅग्रेस पक्षाने देशाला १००% सुजलाम्-सुफलाम् केलयं! मात्र त्यांनी त्यासाठी प्रयत्न नक्कीचं केलेत हे सुद्धा नाकारुन चालणार नाही. याचीही दखल या ठिकाणी घेणे अगत्याचे ठरेल. उदा. १९६६-६७ मध्ये पहिली हरीत क्रांतीला सुरुवात असाे, किंवा १४ मे १९७४ मधील पाेखरण येथील पहिली अणुचाचणी, जागतिक शीतयुद्धांत भारताची निर्णायक भुमिका, किंवा अलिकडील १९९१-९२ चे आर्थिक उदारीकरणाचे धाेरण असाे ईत्यादी. अनेक महत्वाची निर्णय हे मागील सत्तर वर्षातच घेण्यात आलेली आहेत म्हणुनचं आज आपण भारत महासत्ता हाेण्याचे प्रत्यक्ष स्वप्न रंगवु लागलाे. याची जर आपण आपल्या कलिग राष्ट्रांशी तुलना करुन पाहीली तर निच्छित आपल्या मागील सत्तर वर्षाची कल्पणा येईल यात शंका नाही.
१९८४ साली अमेरिकेने भारताला सुपर संगणक देण्यास नकार दिला तेव्हां, तत्कालीन दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधीनी सुपर संगणक निर्मितीची याेजना आखुन १९९१ मध्ये अमेरिकाच्या नाकावर टिच्चुन "परम" नावाचा स्वदेशी बनावटीचा पहिली सुपर संगणक बनवला, व भारतात माहिती तंत्रज्ञानाला सुरवात झाली, त्यालाच आपण आज आयटी-युग म्हणताे. याच आयटी-युगाला ऐकेकाळी म्हणजेच १९८४ दरम्यान सद्याच्या सत्तारुढ भाजप पक्षाने संगणकला प्रत्यक्ष रित्या जाहिर विराेध केला हाेता. आणि हे सर्व विसरुन भाजप पक्ष आज डिजिटल इंडियावर भाषने देतानी दिसून येतो , त्याच संगणकाच्या मांध्यमाद्वारे भाजप नेते साेशल मिडियावर (Facebook, WhatsApp, Twitter) वर पक्षाचा प्रचार करुन आपले ज्ञान पाझरवतांना दिसतात, आणि मागील सत्तर वर्षात काहीच झाले नसल्याचा खाेेटा आव आणतात. हे म्हणजे सर्व हस्यासपद व आर्श्चायकारक म्हणावं लागेल!
२०१४ साली अमाप/अगणित आश्वांसने देऊन भाजप पक्ष सत्तेत आला, त्यातील एकही आश्वासन तडिपार नेल्याचे या मावळत्या पाच वर्षात दिसले नाही! फक्त "ढिगभर" याेजनांचा जाहीर ऐल्गार करुन, चालु-घडामोडीचा मुलांचा अभ्यास तेवढा वाढवून ठेवला! असो, तासा-तासाला "ठरावीक लाभार्थीच्या" जाहिराती दाखवुन, व काहीप्रमाणात रस्ते बांधुन जणतेची पाेटं भरत नसतात! नाेटबंदी करुन जुन्या नाेटा किती RBI कडे परत आल्या? व नविन किती छापल्या गेल्या? काळा पैसा किती परत आला? या सर्वांचा हिशाेब करता-करता सत्तारुढ सरकारची दमछाक झाली, त्यातच एक पंचवार्षीक संपत आली, यात मात्र भारतीय अर्थव्यवस्तेचा कणा माेडुन, अर्थव्यवस्था पार काेमात नेवुन ठेवलीय.
आज माननीय. पंतप्रधान श्री नरेंद्र माेदी मागील सत्तर वर्षात काहीच झालं नाही! व त्याचा हिशाेब विचारतात, परंतु पुढील वर्षी २०१९ मध्ये मागील पाच वर्षात (२०१४-१९) दिलेल्या आश्वासनांचा हिशाेब जर जनतेनी त्यांना विचारला तर माननीय. पंतप्रधान यांना आर्श्चाय वाटु नये म्हणजे झालं.
✒ सतीश इंगळे.
_____________________________________________
Article By Satish Ingle.