मराठी-ई-अर्टिकल या मराठी ब्लॉगवर आता आपणही व्यक्त होऊ शकता व्यक्त होण्यासाठी लेख, अग्रलेख, कविता, चारोळी ईत्यादींचा समावेश असेल.

Friday, October 26, 2018

बुलेट ट्रेन किती महत्वाची?

     अलिकडेच भारताला स्वातंत्र हाेऊन ७१ वर्ष पुर्ण झालीत. या ७०-७१ वर्षात ब्रिटीशांनी उभारलेल्या एकुण रेल्वेच्या २५% ही आद्याप रेल्वेचे नवीन जाळे आपण उभारु शकलाे नाही! ही वास्तविकता आहे. आणि हिच भारताची शाेकांतिका पण अाहे असे म्हटल्यास वावगे ठरु नये.
       आ णि आपण आज केवळ जगाशी तुलना करुन देशात 'बुलेट ट्रेन' चे दिवा स्वप्न बघत आहाेत! स्वप्न बघण्यात काहीच हरकत नाही परंतु त्या आधी देशात आहे त्याच रेल्वेची तुट भरुन काढली पाहिजे. देशात अनेक भागात रेल्वेची मागनी हाेत असुनही आपण ती पुर्ण करु शकलाे नाही, अलिकडेच अापण मुंबई ठिकाणी केवळ रेल्वे स्टेशनवर ब्रिज अरुंध असल्याने माणसे किडे-मुंग्या प्रमाने चेंगराचांगरी हाेऊन मरतात, हरयाणा मध्येही दसरयाच्या दिवशी ६०-६५ लाेकांना रेल्वे चिरडते या असल्या घटनेने जगात भारताची नाचंकी हाेते आणि आपण "मेरा देश बदल रहा हैं.. आगे बढ रहा हैं.." चे गाने गात फिरताेयं! महत्वाचा मुद्दा हा आहे भारतात आजही पायाभुत सुविधा उपलब्ध नाहीत आणि आजही स्वतंत्र भारतात अनेक लाेकांनी आयुष्यात कधी रेल्वेनी प्रवास केलेला नाही किबंहुना रेल्वेला आजुनही त्यांनी प्रत्यक्ष डाेळयांनी बघितलेली नाही. आणि आपण बुलेट ट्रेन च्या गप्पा मारताे.
     राहिला प्रंश्न मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा, महाराष्ट्रात बुलेट ट्रेन १२० कि.मी धावणार त्यासाठी राज्य सरकारला २७ हजार काेटी द्यावे लागणार आहे आणि गुजरात राज्यात बुलेट ट्रेन ३८८ कि.मी धावणार खर्च किती? २७ हजार कराेड म्हणजे महाराष्ट्रा ऐवढाचं कसं काय? हा कुठंला न्याय? यात केंद्र सरकार ५०% निधी देणार आहे आणि २५% महाराष्ट्र व २५% गुजरात. आपले राज्य सरकार अगाेदरचं कर्जात बुडालेलं, त्यात GST मुळे महसुलात कात्री लागलेली. महाराष्ट्रांची अर्थव्यवस्था सद्या सलाईन वर चालु असतानां आणखी वाढिव 'बुलेट ट्रेन' चा आहेर कशासाठी?  मुळात हा लेख लिहण्यामागचा मुख्य हेतु हा आहे की 'बुलेट ट्रेन' आपल्यासाठी किती महत्वाची? तुम्हीचं ठरवा.
                                                         - सतीश इंगळे.

**(कृपया आपल्या प्रतिक्रिया खालिल कमेंट बाॅक्स मध्ये अवश्य दया.)
         
******************************************
                    Article By Satish Ingle.
                                 

1 comment:

गाजरांचा पाऊस!

  गाजरांचा पाऊस! शीर्षक बघुनच अनेकांच्या भुव्या निश्चितच उंचवल्या असतील! कारण ते एक अतिशाेक्तीच उदाहरण आहे. या ठिकाणी त्याचा शब्दशहा अर्थ न...

Copyright Ⓒ 2022, Marathi e-Article All Rights Reserved.