एक दिवस संध्याकाळची वेळ हाेती लगभग काहीच मिनिटांनी अंधारच हाेणार हाेता, मला काही पुस्तके बाजारातुन आणायची हाेती, दुकाणे बंद हाेतील म्हणुन जरा मी घाईतचं रुमच्या बाहेर पडलाे. साधारणं चालत शंभर ते दिडशे मीटर अंतरावर मी गेलाे असेल, तेवढयात माझ्या विराेधी दिशेने एक आजी तावातावानं येत आसल्याची दिसली, आजीचं वय अंदाजे ७० ते ७५ दरम्यान असावं! तिच्या डाेक्यावर एक कुरतडलेलं एक गाठाेड हाेत, आणि हातात एक पिशवी, तिच्या पायात चप्पलही नव्हती, तिचा ताे अवतार बघता मी चालतांनी थाेडं थबकलाे! तेवढ्यात तिच्या हातातील पिशवीचा बंद तुटुन ती खाली पडली, त्यातील पडलेले तिचे कपडे ती घाईघाईत भरत हाेती मी जवळ जाऊन म्हणालाे आजी मी मदत करु त्यावर तिची काहीच प्रतिक्रिया आली नाही, ती स्व:तहाचं बडबडत हाेती "नवसाचा दिवा हाेता ना" अस काही तरी क्षणभर माझाही गाेंदळ ऊडाला! थाेडया वेळाने आजी बाेलली "देलं घराच्या बाहेर काढुन तिनं अ्न त्यानं...पण, ताे मह्या नवसाचा हाेताना त्याला लहानाचा माेठा केलाना...वंशाचा दिवा हाेताना" अशा प्रकारे ती बरचं काही बडबडत हाेती.
आता माझ्या लक्षात आलं हाेतं, आजीला तिच्या एकुलत्या एक मुलाने स्व:तच्या आईलाचं घराच्या बाहेर केलल हाेत, वेगळं केल हाेत! मी आजीला थोडं दबक्या आवाजात विचारले, आजी तुम्हीं आता कुठं जाणार? त्यावर आजी रागात म्हणाली " जाईल म्हंसणात" आणि ती पुढे निघुन गेली.
आपल्या भारत देशाला फार माेठी प्राचीन संस्कृती व परंपरा लाभलेली आहे वसुधैव कुटुम्बकम् यातच आपली सामाजिक, काैटंबिक मुळे घट्ट रुजलेली आहेत. वसुधैव कुटुम्बकम संदेश भारतीयांनी सर्व जगाला दिला, म्हणजेच सर्व विश्व एक परिवार आहे, एक कुटूूंब आहे. असा त्याचा सरळ साधा अर्थ हाेताे. परंतु आज त्याच भारतात कुटंब-परिवार विभक्त हाेतांनी दिसतात! रक्ताची नाती तुटतांनी दिसतात! खर म्हणजे हे आपल्या सर्वांच दुर्भाग्यच म्हणावं लागेल!
शेवटी एवढचं सांगेन आयुष्य हे खुप सुंदर आहे क्षणभंगुर आहे फक्त ते जगण्यासाठी अनुभवण्यासाठी आपल्याच रक्तांच्या जिवंत माणसांची कुटुंबाला आज खरी गरज आहे.
- सतीश इंगळे.
**************************************

Article By Satish Ingle.
No comments:
Post a Comment