विसाव्या शतकात इंटरनेटची सुरवात १९६९ मध्ये अमेरिकेतील कॅलिफाेर्निया विद्यापीठात सर्वप्रथम काही माेजक्याच संगणका दरम्यान झाली. त्यानंतर पुढे इंटरनेट सेवेत अधिक संशाेधन हाेऊन त्याचा विस्तार वाढत गेला, आणि १९९१ मध्ये वर्ड-वाईड-वेब (www) इंटरनेटचे जाळे जगभर पसरले आणि संपुर्ण जग इंटरनेटच्या माध्यमाद्वारे आपआपसात एकत्र आले, संवाद वाढला, विचारांची देवाण-घेवानाला प्रारंभ झाला त्यालाच आपण आज जग जवळ आलं अस म्हणताे. भारतात सर्वप्रथम इंटरनेटला सुरवात १९८६ "ऐज्युकेशन्ल रिसर्च नेटवर्क" (ERNET) मध्ये झाली. त्यानंतर १९९५ पासुन इंटरनेट सेवा सार्वजनिकरित्या संपुर्ण भारतात प्रसारित करण्यात आली. पुढे अनेक "साेशल माध्यमे" उदयास आली उदा. Orkut, Facebook, Twitter ,WhatsApp Instagram ईत्यादी. सुरुवातीच्या काळात या सर्वांशी फार कमी लाेक जाेडले गेले हाेते परंतु, आजच्या घडीला स्मार्टफाेनच्या युगात असंख्य लाेक साेशल माध्यमांशी जाेडले गेले आहेत. आज भारतात सुमारे ४० काेटी पेक्षा अधिक लाेक साेशल माध्यमांचा वापर करतात. भविष्यातील पुढील काही दशकात त्याचे स्वरुप खुप माेठे असणार आहे यात शंका नाही.
साेशल माध्यम मुळात एक संवाद, विचार व परिचयाचे एक हक्काचे व्यासपीठच आहे! आणि ज्ञानाचेे भंडार! जगाच्या पाठीवरील कुठलाही निवाशी एकमेकांशी जाेडला जावा, एकत्र यावा साेशल माध्यमांचा हाच मुख्य उद्देश हाेता आणि आहे. परंतु आज अनेक लाेक किवां अनेक देश साेशल माध्यमांद्वारे निवडणुकीचा प्रचार व जाहिरात करतात, व त्याचा वाेट बॅंक साठी पुरेपुर वापर करतानां दिसतात. गेल्या मागील दशकात साेशल माध्यमाद्वारे जगात अनेक ठिकाणी राजकिय, सामाजिक, आर्थिक विषयांशी संबधीत यशस्वी चळवळी झालेल्या आपण बघितल्या. त्याच बराेबर हिसंक काही आंदोलनेही बघीतले. आज साेशल माध्यमांचा दुधारी शस्त्र म्हणुन वापर हाेतांना दिसताे. अलिकडेच आपण अनेक ठिकाणी पाेलीस प्रशासनाने इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद केल्याचे बघितले, त्याचे कारण, साेशल माध्यमाद्वारे सामाजातील काही समाजकंठक जाती- धर्माच्या नावाखाली काही आक्षेपार्ह मजकुर पसरवुन लाेकांचे डाेके भडकवतात, साेशल माध्यम वापरकर्तेही त्याची खरी खाेटी पडताळनी न करता मेसेजेस इतरांना आहे तसा फाॅरवर्ड करतात, परिणामी सामाजिक अस्थिरता निर्माण हाेते व प्रशासन व्यवस्था ठप्प हाेते. भारतात 'सायबर क्राईम' कायदा अस्थित्वात आहे त्यानुसार शेकडाे गुन्हें दरवर्षी दाखल हाेतात परंतु हवी तशी किंवा युराेपीयन राष्ट्रांप्रमाने जलद अंमलबजावणी व गांभीर्यता त्यात दिसुन येत नाही.
आज भारतात शहरापासुन ते खेड्यांपर्यंत साेशल माध्यमांचा वापर हाेताे, खरं म्हणजे ही चांगली बाब म्हणता येईल! जगा बराेबर चालण्यासांठी या गाेष्टी आवश्यक आहे. फक्त या ठिकाणी गरज आहे ती साेशल माध्यमांचा कसा? आणि किती? वापर करायचा? ते जाणुन घेण्याची. भारताला जगात आज 'तरुणांचा देश' म्हणुन ओळखले जाते. या सर्व तरुण मनुष्यबळाचा देशाच्या विकासात प्रत्यक्ष याेगदान महत्वाचे असतांना शाेकांतिका अशी आहे की, भारतातील ७०% तरुण साेशल माध्यमांच्या "विखारी व्यसना" मध्ये अडकुन पडला आहे! त्याच्या चक्रविवातुन बाहेर पडणे त्याला कठीण झाल्याचे कुठे तरी दिसून येते उदाहरणार्थ, एखादया तरुणाने Facebook वर किंवा Instagram वर एखादी पाेस्ट अपलाेड केली असेल किंवा फाेटाे टाकला असेल तर ताे त्याला किती Like's मिळतात? व किती कमेंट्स मिळतात? यातच ताे त्याच्या दैनंदीन दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवताे! आणि अख्खा दिवस कधी निघुन गेला? याचा ताळमेळही त्याला लागत नाही! दिवस काय कधी-कधी तर रात्रही निघुन जाते! या सर्वांचा जर आपण गंभीरपणे विचार केला तर, भारताचे उज्वल भविष्यच धोक्यात आहे! असेच म्हणावे लागेल तेव्हा लेखात वर उल्लेख केल्याप्रमाने "विखारी व्यसन" साेशल माध्यमांना आपण का? म्हणू नये.
✒ सतीश इंगळे.

No comments:
Post a Comment